ध्येय
१)मराठी माणसाला सामाजिक, राजकीय, आर्थिक,भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे संयुक्त मराठी मुंबई चळवळीचे मुळ ध्येय आहे.
२)मराठी मातीला, मराठी भाषेला, मराठी संस्कृतीला, मराठी राजकारणाला, मराठी अर्थव्यवस्थेला, मराठी परंपरेला बळकटी देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणे हे संयुक्त मराठी मुंबई चळवळीचे एक महत्वाचे उदिष्ट आहे.
३)मराठीबाणा, मुंबईतील मराठी अस्तित्व कायम अबाधित ठेवण्यासाठी सर्व गिरणी कामगारांचे पुनर्वसन मुंबईतच होणे आवश्यक आहे त्याकरिता सर्व मराठी माणसांना सर्व जातींचे, धर्मांचे, पंथांचे आणि वर्गांचे लोकांना एकत्र करून महाराष्ट्राच्या विकासाठी काम करणे हे संयुक्त मराठी मुंबई चळवळ आपल कर्तव्य मानते .
४)महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या विकासासाठी आड येणाऱ्या सर्व समस्यांची सोडवणूक करणे, या विकासाआड येणाऱ्या सर्व सत्तागट, पंथ आणि समाजगट यांच्याशी मराठी माणसाच्या उत्कर्षासाठी कोणत्याही प्रकारचा संघर्ष करावा लागला तरी परिणमाची पर्वा नकरता संयुक्त मराठी मुंबई चळवळ आपलं कार्य अविरतपणे सुरु ठेवेल.
५) मराठी माणसाला न्याय देताना संयुक्त मराठी मुंबई चळवळ कोणत्याही राजकीय, आर्थिक फायदा-तोट्याचा विचार नकरता फक्त आणि फक्त मराठी माणसाला केंद्रबिंदू ठेऊन कोणताही राजकीय संघर्ष, सामाजिक संघर्षात निर्भीडपणे उतरेल.
६) महाराष्ट्रातील रस्ते, आरोग्य, व्यापार, शेती, वीज, पाणी, शिक्षण, पर्यटन, महिला, कामगार, विद्यार्थी, आदिवासी, कायदा व सुव्यवस्था, क्रीडा, उद्योग, वित्त, गृहखाते, सहकार क्षेत्रांतील सर्व प्रश्नांचा पाठपुरावा करणे आणि त्यात मराठी माणसाचे सर्वंकष वर्चस्व स्थापित करणे, हि संयुक्त मराठी मुंब ई चळवळीच्या काऱ्या ची मुख्य दिशा आहे.
७) संविधानाने मराठी माणसासाठी निर्माण केलेल्या स्वतंत्र महाराष्ट्रात राजकीय,सामाजिक क्षेत्रात फक्त आणि फक्त मराठी माणसाचेच वर्चस्व असले पाहिजे हि संयुक्त मराठी मुंबई चळवळीची विचारधारा आहे.
८)शिवरायांच्या स्वराज्याला जर कोणी गिळंकृत किंवा त्यावर कोणी वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असेल तर समोरील मानसिकता कुठच्याही धर्माची, पंथाची,जातीची असो संयुक्त मराठी मुंबई चळवळ अश्या मानसिकतेला मुघली मानसिकता समजून मराठी मातीत गाडण्याचे कार्य करेल.
९)संयुक्त मराठी मुंबई चळवळ संतज्ञानेश्वर माउली, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजे, मासाहेब जिजाऊ, महाराणी अहिल्याबाई होळकर, छत्रपती शाहू महाराज, तेजसूर्य महात्मा जोतिबा फुले , माई सावित्री, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे बाबा, स्वामी विवेककानंद , अन्ना भाऊ साठे या सर्व थोर पुरुषांच्या सामाजिक विचारांचे संवर्धन करून मराठी माणसाने गेल्या काळात गमावलेला आत्मसन्मान , मराठी स्वाभिमान पुन्हा माझ्या सर्वसामान्य मराठी माणसाला मिळवून देण्यासाठी परिणमाची पर्वा नकरता कार्य करेल.