प्रस्थावना
आई जिजाऊंच्या स्वप्नातील स्वराज्य साकारणारे पुण्यात्मा श्री.छत्रपती शिवरायांच्या चरणी आम्ही हे कार्य समर्पित करीत आहोत. स्वराज्य ही संकल्पना संविधानाच्या माध्यमातून लोकशाही राज्य निर्माण करणारे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन आणि या मातीत जन्मलेल्या सर्व क्रांतीकारकांना, स्वातंत्र्यवीरांना, मावळ्यांना मानाचा मुजरा, कर्माने जनमाणसात फिरणाऱ्या ईश्वरी अंश असलेल्या सर्व संत सज्जनांच्या चरणी नमन करुन मराठी संस्कृती, मराठी भाषा आपल्या येथील रूढी परंपरा आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी संयुक्त मराठी मुंबई चळवळ सदैव प्रयत्नशील राहील ही आम्ही आपणास ग्वाही देतो. आपण कोणत्या धर्मात जन्मला आलो कोणत्या पंथात जन्माला आलो कोणत्या जातीत जन्मला आलो हे महत्वाचं नाही तर आपण छत्रपतींच्या महाराष्ट्रात जन्माला आलोय हे महत्वाचे आहे म्हणून धर्म, जात, पंथ, प्रांत बाजूला ठेऊन आजपासुन ह्या महाराष्ट्र धर्मासाठी, मराठी माती साठी एकत्रीत येऊन जगाला हेवा वाटेल असे महान राष्ट्र घडवुया. – संयुक्त मराठी मुंबई चळवळ