मनोगत
माझ्या तमाम मराठी बांधवांनो,
जय शिवराय,
मुंबई महाराष्ट्राला मिळाली परंतु मराठी माणसाला मिळाली का?
१ मे १९६० रोजी भाषावार प्रांतरचना धोरणाचा भाग म्हणून स्वतंत्र ‘महाराष्ट्र राज्य’ स्थापन झाले. आपण मराठीचं स्वतंत्र राज्य मिळवलं, ते मराठी भाषा, भूमिपुत्र मराठी माणसाच्या विकासासाठी आणि हे राज्य मिळवताना या मातीला आपल्या १०७ मुलांना हौतात्म्य द्याव लागलय आणि हे जर आम्ही विसरणार असू तर आम्हाला छत्रपती शिवरायांचं नाव घेण्याचा अधिकार कसा काय असावा. १९६० पासून २०२४ म्हणजे गेली ६५ वर्ष आम्ही आमच्या मूलभूत हक्कांच्याच लढाया लढतोय. महाराष्ट्रातील काही निवडक राजकीय नाव वघळता बहुतांश राजकीय नेते, पुढारी हे महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यापेक्षा आपला परिवार, आपल्या राजकीय पक्षाला पुढे घेऊन जाण्यातच जास्त व्यस्त होते हे प्रखरषाने जाणवते. त्याचे परिणाम आता महाराष्ट्राला सहन करावे लागत आहेत. महाराष्ट्रातील मराठी माणूस आपले स्थानिक अधिकार अबाधित ठेवण्यात कमी पडल्यामुले प्रथमतः आर्थिक नंतर सामाजिक आणि आता राजकीय क्षेत्रातही मराठी माणसाची ताकद कमी होताना दिसत आहे. १०७ हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन मिळवलेला स्वतंत्र अखंड महाराष्ट्र आपण फक्त नकाशापुरताच अबाधित ठेवला आहे. प्रत्यक्षात मात्र मराठी माणसाने राजकारणाच्या माध्यमातून आपली संस्कृती, आपली माय मराठीभाषा, आपलं अस्तित्व, आपली राजकीय ताकद, आपले भूखंड खूप काही मागील ६५ वर्ष्यात गमावलं आहे. जर मराठी माणसाने ह्या गोष्टींकडे गांभीयाने लक्ष्य घालून जर आपली मानसिकता बदलली नाही तर येणाऱ्या काळात परकीय राजवटीसमोर गुलाम होऊन मान खाली घालून उभा असलेला सामान्य मराठी माणूस आपल्याला पाहायला मिळेल. इंग्रज सुद्धा व्यापार कारण्याकरिताच देशात आले १५० वर्ष येथील मुलुख पारतंत्ऱ्या त होता. आज परप्रांतीय आमदार , खासदार होण्याकरिता आपल्या महाराष्ट्रात येऊन आपल्याच मराठी माणसाच्या विरोधात दंड थोपटतात आणि काही मराठी मतदार आपल्या शुल्लक अश्या आर्थिक फायद्या करिता त्यांना निवडूनही देतात परंतु आपण आपले किती मोठे सामाजिक नुकसान करत आहोत ह्याची जाणीव करून घ्या आणि त्यादिवशी तुम्हाला कळेल आपणच आपल्या पुढील पिढ्यांच्या वर परकीय राजवट लादण्याची सुरवात करत आहोत. सध्याची स्थिती पाहता अशी कितीतरी छुपी आक्रमण माझ्या मराठी मुलखावर , माझ्या मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच करवून घेतली जात आहेत याच दुःख आहे. मराठी अस्तित्व वाचवण्याचा निर्धार घेऊन मराठीबाणा, मुंबईतील मराठी अस्तित्व कायम अबाधित ठेवण्यासाठी सर्व गिरणी कामगारांचे पुनर्वसन मुंबईतच होणे आवश्यक आहे त्याकरिता पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेल्या स्वराज्याची सेवा आणि बाबासाहेबांच्या संविधानाचे संवर्धन करण्यासाठी म्हणून संयुक्त मराठी मुंबई या सामाजिक विचारधारेची स्थापना केली आहे .