१५ मार्च २०२४ च्या अन्यायकारक शासन निर्णयाचा जाहीर निषेध!

गिरणी कामगारांवर अन्याय – १५ मार्च ‘काळा दिवस’ म्हणून पाळा!

मुंबईच्या उभारणीत आपले रक्त, घाम आणि आयुष्य घालवलेल्या गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काच्या घरांपासून दूर करण्याचा कट १५ मार्च २०२४ रोजी रचला गेला. हा दिवस गिरणी कामगारांच्या संघर्षाचा, त्यांच्या स्वप्नांच्या आणि त्यांच्या अधिकारांच्या विश्वासघाताचा काळा डाग आहे. ज्यांनी संपूर्ण आयुष्य मुंबईला दिलं, त्यांनाच या शहरातून बाहेर ढकललं जात आहे. हा निर्णय म्हणजे केवळ एक सरकारी आदेश…