निःस्वार्थ झटणारा कार्यकर्ता : रमाकांत बने

मुंबईसारख्या महानगरात अनेक मोर्चे, आंदोलने आणि सभा होत असतात. पण काही मोर्चे केवळ मागण्यांसाठी नसतात, तर ते असतात न्यायासाठी, हक्कासाठी आणि माणुसकीसाठी. १० मार्च २०२६ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर झालेला गिरणी कामगारांचा मोर्चा हाच अशाच लढ्यांपैकी एक होता. या मोर्च्याची मागणी स्पष्ट होती — गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळाली पाहिजेत आणि वंचित घटकांना न्याय्य संधी…