९ ऑगस्टची ‘गिरणी कामगार क्रांती सभा’ ठरणार निर्णायक; घरांच्या हक्कासाठी प्रत्येक गिरणी कामगार व वारसाने उपस्थित राहण्याचे आवाहन
मुंबईतील गिरणी कामगार व त्यांच्या वारसांच्या घरांचा प्रश्न आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर पुढील संघर्षाची दिशा निश्चित करण्यासाठी ९ ऑगस्ट (क्रांती दिन) रोजी आयोजित करण्यात आलेली ‘गिरणी कामगार क्रांती सभा’ अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या सभेत मुंबईतील गिरणी कामगारांचे पुनर्वसन मुंबईतच सन्मानाने व्हावे, गृहनिर्माण योजनेपासून वंचित राहिलेल्या पात्र…