गिरणी कामगारांच्या घराच्या हक्कासाठी निर्णायक लाँगमार्च — ०९ जुलै रोजी मुंबईत ऐतिहासिक मोर्चा
मुंबई | प्रतिनिधी मुंबईतील गिरणी कामगारांच्या घराच्या हक्काच्या लढ्याला आता निर्णायक वळण मिळाले असून, राज्यातील १४ गिरणी कामगार संघटना एकत्र येऊन ‘गिरणी कामगार संयुक्त लढा समिति’ची स्थापना करण्यात आली आहे. या ऐतिहासिक एकत्रीकरणाच्या पार्श्वभूमीवर ०९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता भायखळा राणीबाग येथून आझाद मैदानापर्यंत मोठा लाँगमार्च मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे औपचारिक घोषणापत्र…