साताऱ्यात शिवधर्म फाउंडेशनचा मोर्चा
सातारा ,०७ एप्रिल २०२५ — पुण्यानंतर आता साताऱ्यातही शिवधर्म फाउंडेशनने जोरदार मोर्चा काढत संभाजी ब्रिगेडला थेट इशारा दिला आहे. “संभाजी नव्हे, छत्रपती संभाजी महाराज” असा नारा देत, शिवधर्म फाउंडेशनने संभाजी ब्रिगेडच्या संघटनेच्या नावातील एकेरी उल्लेखाचा तीव्र निषेध केला आहे. आज सायंकाळी साताऱ्यातील शिवतीर्थ येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या भव्य मोर्चात मोठ्या संख्येने शिवभक्तांनी सहभाग…