महाराष्ट्र

महाराष्ट्र म्हणजे तुमचं घर! “घर सांभाळायचं की विकायचं?”

महाराष्ट्र! ही केवळ एक भौगोलिक ओळख नाही, तर इथल्या मातीत रक्त सांडून राखलेली संस्कृती आहे. इथल्या माणसांनी घडवलेला इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने उभा केलेला हा अभिमानाचा किल्ला आहे. मात्र, आजच्या काळात या मातीत जन्मलेल्या मराठी माणसालाच स्वतःच्या घरात परक्या सारखं वागवलं जातंय. मुंबई, पुणे, नाशिकसारखी शहरं विकसित झाली, रोजगार वाढला, उद्योगधंदे उभे…

अजूनही घराची वाट पाहणारे कामगार…

अजूनही घराची वाट पाहणारे कामगार…

मुंबईच्या रस्त्यांवरून चालताना कुठल्याही वयोवृद्ध माणसाच्या डोळ्यांत डोकावून पाहिलं, तर त्यात एक वेदना दिसेल. ही वेदना आहे गिरणी कामगारांची! त्यांच्या संघर्षाची, त्यांच्या प्रतीक्षेची, त्यांच्या तुटलेल्या स्वप्नांची! १९८२ सालचा तो ऐतिहासिक संप, ज्या संपानं लाखो गिरणी कामगार रस्त्यावर आणले, आजही त्या संपाचे पडसाद त्यांच्या आयुष्यभराच्या दु:खात उमटत आहेत. गिरण्या बंद पडल्या, रोजगार गेला, सरकारं बदलली, पण…