मुंबईच्या उभारणीत आपले रक्त, घाम आणि आयुष्य घालवलेल्या गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काच्या घरांपासून दूर करण्याचा कट १५ मार्च २०२४ रोजी रचला गेला. हा दिवस गिरणी कामगारांच्या संघर्षाचा, त्यांच्या स्वप्नांच्या आणि त्यांच्या अधिकारांच्या विश्वासघाताचा काळा डाग आहे.
ज्यांनी संपूर्ण आयुष्य मुंबईला दिलं, त्यांनाच या शहरातून बाहेर ढकललं जात आहे. हा निर्णय म्हणजे केवळ एक सरकारी आदेश नाही, तर गिरणी कामगारांच्या आशा, कष्ट आणि अस्तित्वावर घातलेला घाला आहे.
हा अन्याय विसरण्यासाठी नाही, त्याच्या विरोधात उभं राहण्यासाठी आहे! त्यामुळे संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या वतीने १५ मार्च हा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
हा लढा थांबणार नाही, अन्यायाविरोधात आवाज उठवला जाईल – १५ मार्च विसरला नाही पाहिजे!
One Comment
Total right ahe