मुंबई | प्रतिनिधी
“०९ जुलैच्या गिरणी कामगारांच्या मोर्चात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र दिसू शकतात!” असे विधान शिवसेना नेते सचिन भाऊ अहिर यांनी माध्यमांशी बोलताना केले.
त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “मोर्चात सर्व पक्षीय नेत्यांना आमंत्रित करणार आहोत. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या आधीच मोरच्यात सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे. येणाऱ्या १/२ दिवसात राज साहेबांचीही भेट संयुक्त लढा समिति घेणार आहे.”
सरकारवर टीका करताना सचिन अहिर म्हणाले, “सरकार घरे देऊन गिरणी कामगारांवर मेहरबानी करते का?” अशी थेट विचारणा करत, खडे बोल सुनावले. “मुंबईत एन. टी. सी. गिराण्यांची जमीन आणि अन्य ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळू शकत असताना देखील शेलू, वांगणी यासारख्या खेडेगावांमध्ये घरे देऊन गिरणी कामगारांची फसवणूक करण्याचे षडयंत्र आहे,” असे ते म्हणाले.
“गिरणी कामगारांचा हा मोर्चा निर्णायक ठरेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
@गिरणीकामगार, @उद्धवठाकरे, @राजठाकरे, @गिरणीमोर्चा, @०९जुलैमोर्चा, @गिरणीकामगारसंघर्ष, @संयुक्तमोर्चा, @मुंबईहक्काची, @म्हाडाविरोधात, @कामगारहक्क, @गिरणीइतिहास, @शिवसेना, @मनसे, @राजकीयएकत्रिता, @मोफतघरहवंय, @NTCजमीन, @वंचितकामगार, @मराठीमोर्चा, @संघर्षएकत्र, @गिरणीवारस