Home » LATEST NEWS » संयुक्त मराठी मुंबई चळवळ – गिरणी कामगार मासिक सभा मुंबई, दि. ९ सप्टेंबर २०२५

संयुक्त मराठी मुंबई चळवळ – गिरणी कामगार मासिक सभा मुंबई, दि. ९ सप्टेंबर २०२५

संयुक्त मराठी मुंबई चळवळ – मासिक सभा

मुंबई, दि. ९ सप्टेंबर २०२५ :
गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांच्या पुनर्वसनाच्या न्याय्य मागणीसाठी लढा देणाऱ्या संयुक्त मराठी मुंबई चळवळ या संघटनेची मासिक सभा रविवार, दि. १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता दुसरा मजला, रुद्रा हाइट्स (जुनी दळवी इमारत), परळ (पूर्व) येथे आयोजित करण्यात आली आहे.

या सभेत उर्वरित सर्व कामगार व वारसांचे अर्ज भरून घेणे आणि मुंबईतच पुनर्वसनाची हमी मिळवण्यासाठी पुढील निर्णायक भूमिका ठरविणे हे प्रमुख अजेंडे असतील. तसेच, १० जुलै २०२५ रोजीच्या सभेत घेतलेल्या निर्णयांची त्वरित अमलबजावणी न झाल्यास पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलनात्मक लढा उभारण्याचा इशारा सभेत देण्यात येईल.

वंचित कामगार व वारसांना अर्ज करण्याची संधी मिळावी यासाठी प्रशासकीय पाठपुराव्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून, या संदर्भात वंचित बांधवांनी आपल्या पुराव्यांच्या एक झेरॉक्स प्रतीसह सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

“आपली एकजूटच आपली ताकद आहे. हा लढा मुंबईतील प्रत्येक गिरणी कामगार व वारसाच्या घरासाठी आहे,” असे संयुक्त मराठी मुंबई चळवळीचे अध्यक्ष विवेकानंद बेलूसे म्हणाले.
७७३८५९१२६२, ९१७५३७८१९९, ७३०४७५६५४७, ९८६९२८१५९१. www.sanyuktmarathi.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

LATEST NEWS