बोरिवली, १९ एप्रिल २०२५ — महाराष्ट्र संरक्षण संघटनेतर्फे शनिवार, दिनांक १९ एप्रिल २०२५ रोजी बोरिवली रेल्वे स्टेशन (पूर्व) येथे एक विशेष स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली आहे. संध्याकाळी ४ ते ७ या वेळेत मराठी अस्मिता, हक्क आणि महाराष्ट्राच्या हितासाठी ही मोहीम राबवली जाणार आहे.
ही मोहीम केवळ स्वाक्षऱ्यांची नसून, मराठी जनतेमध्ये जागृती, प्रबोधन आणि आपल्या मातीतल्या प्रश्नांवर एकत्र येण्याचे एक महत्वाचे माध्यम ठरणार आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या रक्षणासाठी आणि मराठी भाषेच्या हक्कासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे.
संघटनेच्या वतीने सर्व मराठी बांधवांना आवाहन करण्यात आले आहे की, आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून या उपक्रमात सहभागी व्हावे. संघटनेचे कार्यकर्ते सांगतात — “आम्ही मैदानात उतरलो आहोत, तुम्ही फक्त साथ आणि पाठिंबा द्या. हे शिवधनुष्य आम्ही उचलले आहे, गरज आहे तुमच्या सहकार्याची!”
ही मोहीम मराठी स्वाभिमान, रोजगार, संस्कृती आणि भाषेच्या हक्कासाठी एक ठोस पाऊल म्हणून पाहिली जात आहे.
मोहीम ठिकाण:
बोरिवली रेल्वे स्टेशन (पूर्व)
वेळ: ४:०० ते ७:०० संध्याकाळ
दिनांक: शनिवार, १९ एप्रिल २०२५
मराठी माणसाने शिवरायांच्या मातीसाठी, आपल्या हक्कासाठी आणि स्वाभिमानासाठी या मोहिमेला उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेने केले आहे.