मुंबई |
हुतात्मा दिनानिमित्त १०७ हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबई व उपनगरातील तसेच राज्यातील विविध मराठी संघटना हुतात्मा चौकात एकत्र आल्या.
या निमित्ताने झालेल्या चर्चेत मराठी समाजाची राजधानीतील घसरती लोकसंख्या, मराठी भाषिकांचे वाढते प्रश्न आणि आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मराठी मतदारांचा निर्णायक सहभाग या विषयांवर विस्तृत चर्चा झाली.
संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले की – मुंबईतील मराठी माणसाची स्थिती, घरांचे प्रश्न, नोकरीतील घटती टक्केवारी आणि स्थानिक हक्कांवरील दबाव या गंभीर मुद्द्यांवर एकत्रित पातळीवर भूमिका घेणे आवश्यक झाले आहे. यातूनच एक महत्त्वपूर्ण निर्णय उदयास आला की,
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी मराठीसाठी काम करणाऱ्या सर्व संघटनांनी एकत्र बसून ठोस रणनीती ठरवावी. त्यासाठी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता, दादर येथील शाहू सभागृहात सर्व मराठी संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आगामी निवडणुकीत मराठी मतदारांची ताकद वाढवणे, एकत्रित भूमिका घेणे आणि मराठी हिताच्या मुद्द्यांना प्राधान्य देणारी दिशा ठरवण्याची शक्यता आहे.
राजकीय निरीक्षकांच्या मते,
ही बैठक प्रत्यक्षात आली आणि अनेक संघटना एकत्र आल्या, तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलू शकतात.






